जॉब नसल्याने इमारतीवरून उडी मारून महिलेची आत्महत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : कांदिवली पश्चिम येथे एका 40 वर्षीय महिलेने इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केली. ही घटना 2 जानेवारी रोजी चारकोप येथे घडली. डिंपल वाडीलाल असं या मृत महिलेचं नाव आहे. तिची आई म्हणाली की, ‘गेल्या काहीदिवसांपासून डिंपलकडे जॉब नव्हता. त्यामुळे ती डीप्रेशनमध्ये गेली होती. तसेच तिचे लग्नही झाले नव्हते.

या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलसांनी या घटनेची नोंद केली असून अधिक तपास करत आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता. महिला आठव्या मजल्यावरुन उडी मारत आहेत. तर खाली काही लोक तिला पकडण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पण या दरम्यान महिलेने उडी घेत आत्महत्या केली.

पोलिसांनी घटनास्थळावरुन डींपलचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो रुग्णालयात पाठवला आहे. या घटनेची अधिक चौकशी पोलिसांकडून सुरु आहे.