डाॅ. प्रकाश आंबेडकरांची बहुजन आघाडीची घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे : भा.रि.प. बहुजन महासंघाचे नेते डाॅ. प्रकाश आंबेडकर यांनी पुणे येथील पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडीची घोषणा केली आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून त्यांनी हे पाऊल उचलले आहे. जे जे स्वत:ला पुरोगामी विचाराचे समजतात अशा सर्वांना आमच्या आघाडीची दारे उघडी असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले अाहे. काॅग्रेस – राष्ट्रवादी आदी पक्षांना आमच्या अटी मान्य असतील तर त्यांचे आघाडीत स्वागत असेल असे ते यावेळी म्हणाले. रामदास आठवलेंना तुम्ही या आघाडीत घ्याल काय असे विचारले असता जे लोक प्रतिगामी विचाराच्या पक्षांना आपले मित्र मानतात त्यांना आम्ही पुरोगामी समजत नाही असे म्हणत आठवलेंना आघाडीत नो ऐंन्ट्री असल्याचे स्पष्ट केले. तसेच शिवसेनेने नुकतीच स्वबळाची निवडणुका लढवण्याची घोषणा केल्याने त्यांचा बहुजन आघाडीत येण्याचा प्रश्नच येत नाही असेही ते म्हणाले. “आम्ही कोणत्याही पक्षाकडे स्वत:हून जाणार नसून ज्यांना आमचा विचार पटतो आहे अशांनी स्वत: आम्हाला अपिल व्हावे” असे म्हणुन आंबेडकरांनी पुरोगामी विचारसरणीच्या पक्षांना वंचित बहुजन आघाडीत सामिल होण्याचे आवाहण केले आहे. “जो जो समुह स्वत:ला वंचित समजतो अशांना आम्ही बैठकीला बोलावले आहे. आलुते बलुतेदारांची मोट बांधण्याचा आमचा प्रयत्न असून राजकारणातील घराणेशाही मोडण्याचा आमचा मनोदय आहे” असे डाॅ. आंबेडकर म्हणाले. “लोकशाहीचं सोशलायझेशन होणे गरजेचे आहे. वंचित समाजातील घटकांना संसदेत प्रतिनिधीत्व मिळावे अशी आमची इच्छा आहे. भटक्या विमुक्त जमाती, धनगर समाज, माळी समाज, मुस्लिम समाज आदीं समाजांतील प्रतीनिधींना प्रत्तेकी दोन उमेदवार्या देण्याचा निर्णय वंचित बहुजन आघाडी ने घेतला आहे” असेही आंबेडकर यांनी यावेळी नमुद केले.

Leave a Comment