रायगड प्रतिनिधी। खालापूर तालुक्यातील तुपगाव जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पोषण आहारात किडे तसच निकृष्ट दर्जाचे कडधान्य आढळून आले आहे. तुपगाव ग्रामस्थांनी शाळेत भेट देऊन पोषण आहाराची पाहणी केली तेव्हा हा सगळा प्रकार समोर आला.
हरभरा व डाळ यामध्ये किडे पाखरे असलेलं अन्न विद्यार्थ्यांना देण्यात येत असल्यान पालकांमध्ये घबराट निर्माण झालीये. राज्य सरकारच्या वतीन सर्वच जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना पोषक आहार मिळावा. या उद्देशान ही योजना सुरू करण्यात आलीये. मात्र विद्यार्थ्यांना चांगला आहार देण्यात येत नाही. घटनेची माहिती मिळताच खालापूर प्रभारी गट शिक्षण अधिकारी भाऊसाहेब पोळ तसच केंद्रप्रमुख देविदास पाडवी यांनी शाळेला भेट दिली.
तेव्हा त्यांना पोषण आहारातील कडधान्य हे निकृष्ट दर्जाचे असल्याच निदर्शनास आल. त्यांनी संबंधित मुख्याध्यापिका यांना सूचना करून सक्त ताकीद दिली. मात्र प्रसारमाध्यमांशी बोलण्यास गटशिक्षणाधिकारी यांनी टाळले. व पूर्ण घटनेची माहिती घेऊन कारवाई करण्याच आश्वासन दिले.