तुमचं Youtube चॅनल कधीही बंद होऊ शकतं, युट्यूबची नवी नियमावली

0
50
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | गुगलची व्हिडीओ स्ट्रीमिंग साईट युट्यूबने आपल्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. युट्यूबचे नवे नियम युट्यूबर्ससाठी डोकेदुखी ठरु शकतात युट्यूबने नवे नियम जारी करत सांगितलं की, जर कुठल्या चॅनलमुळे युट्यूबची कमाई होत नसेल, तर ते चॅनल डिलीट केलं जाईल किंवा त्यावर निर्बंध लावले जातील.

युट्यूब नावाने एक ब्लॉग प्रकाशित केला आहे. या अंतर्गत जर तुमच्या युट्यूब चॅनलने कंपनीची कमाई होत नाही, तर युट्यूब तुमचं अकाऊंट किंवा चॅनल डिलीट करेल. युट्यूबचे नवे नियम 10 डिसेंबरपासून लागू होणार आहेत. मात्र, यामध्ये किती दिवसांपर्यंत चॅनलपासून कमाई झाली नाही तर चॅनल डिलीट केलं जाईल याबाबत काहीही माहिती देण्यात आलेली नाही.

म्हणजेच, जर तुमचं युट्यूब चॅनल मोनोटाईज झालं नाही, तर तुमचं चॅनल कुठल्याही क्षणी बंद होऊ शकतं. यासंबंधी युट्यूबने गेल्या आठवड्यात युट्यूबर्सला ई-मेल पाठवला आहे. तसेच, युट्यूबच्या नव्या नियमांनुसार जर कुणाला त्यांचं चॅनल डिलीटच होण्याची भीती असेल तर तुम्ही तुमचा कंटेट डाऊनलोड करु शकता, असंही युट्यूबने सांगितलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here