‘त्रिभंगा’ च्या कलाकारांशी खास चर्चा करताना काजोल म्हणाली-“महिलांसाठी मानवी दृष्टीकोन आवश्यक आहे!”

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । बॉलिवूड अभिनेत्री काजोलचा चित्रपट ‘त्रिभंगा’ चा ट्रेलर (Tribhanga Trailer) काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर इमोशन्सनी भरलेला असून, पडद्यावर आई आणि मुलीची कथा दाखविण्यात आली आहे. हा चित्रपट 15 जानेवारीला नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये असे दिसून आले आहे की, या चित्रपटाची गोष्ट एका आई-मुलीच्या नात्यावर आधारित आहे, जिथे काजोलला तिच्या आईचा तिरस्कार आहे असे दाखविण्यात आले आहे. खास गोष्ट म्हणजे हा चित्रपट काजोलचा नवरा आणि बॉलीवूड अभिनेता अजय देवगन याच्या प्रॉडक्शन हाऊसने बनवला आहे. या चित्रपटामध्ये काजोल व्यतिरिक्त तन्वी आझमी आणि मिथिला पालकरसुद्धा दिसणार आहेत. या चित्रपटाची कथा अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी लिहिली आहे. रेणुकाने या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले आहे.

या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जवळ आली असून त्याचे प्रमोशनही जोरात सुरू आहे. अलीकडेच त्रिभंगाची टीम न्यूज 18 च्या यूट्यूब चॅनल शोशा (SHOWSHA) शी कनेक्ट झाली आणि त्यांनी वैशाली जैन यांच्यासोबत चित्रपटासह अनेक विषयांवर चर्चा केली. चित्रपटाची दिगदर्शिका रेणुका शहाणे यांनी मातृत्व आणि महिलांच्या जीवनात केलेल्या निवडींविषयी सांगितले. रेणुका म्हणाल्या- “आई होणे ही चांगली गोष्ट आहे परंतु स्त्रीने स्वतःला ओळखणे आणि स्वत: साठी घेतलेल्या निर्णयाचा आदर करणे देखील आवश्यक आहे. मला आनन्द आहे कि, या चित्रपटाच्या माध्यमातून लोकं मातृत्वाकडे मानवतेच्या दृष्टिकोनातून पाहिले जाऊ लागले. ”

तन्वी आझमी म्हणाल्या की, हा चित्रपट लोकांना विचार करण्याला एक नवा दृष्टीकोन देतो. या मुलाखतीत तन्वी म्हणाल्या- “रेणुकाने आई-मुलीच्या नात्याबाबत अशी कथा लिहिली आहे आणि ती दिग्दर्शितही केली आहे ही फार आनंदाची बाब आहे. यापूर्वी आम्ही या चित्रपटात आई-मुलीचे नाते दाखवले नाही, असेही त्यांनी नमूद केले.

https://youtu.be/fTHG91Cd3Zs

या चित्रपटाच्या कथेबाबत बोलताना तन्वी म्हणाल्या की,- “आई नेहमीच देवीसारखी नसते. तिच्यातही काही कमतरता असू शकतात, तिलाही काही समस्या उद्भवू शकतात परंतु असे असूनही ती एक उत्तम व्यक्ती असू शकते. स्त्रीला मातृत्व चाचणीत पूर्ण गुण मिळणे आवश्यक नसते तर माणूस असल्याच्या परीक्षेत ती शंभर पैकी शंभर मिळवू शकते. आपल्या पालकांना आपल्याला जाणून घ्यावे लागेल आणि त्यांच्यातही काही समस्या आहेत हे समजून घ्यावे लागेल. तसेच त्यांच्यातही काही कमतरता असू शकतात आणि तरीही आपण त्यांच्यावर प्रेम करू शकतो. ”

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment