सांगली प्रतिनिधी | स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने थकीत ऊस बिले तातडीने द्यावीत या मागणीसाठी गुरुवारी केन ऍग्रो साखर कारखान्यावर मोर्चा काढण्यात आला. 28 जून पर्यंत बिले देतो असे लेखी पत्र कारखाना प्रशासनाच्यावतीने देण्यात आले 28 पर्यंत बिले न दिल्यास 29 जून पासून कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्या घरासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी पक्षाचे जिल्हा अध्यक्ष महेश खराडे यांनी दिला.
हा मोर्चा प्रथम कडेपुर गावातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आला त्यानंतर मोर्चा केन ऍग्रो कारखान्यावर आला मोर्चा जिल्हा अध्यक्ष महेश खराडे याच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला कारखाना कार्यस्थळवर। आल्यावर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले यावेळी बोलताना खराडे म्हणाले 2018 /2019 या चालू गळीत हंगामातील 10 कोटींची ऊस बिले अद्याप दिलेली नाहीत यासंदर्भात शेतकऱ्यांनी वारंवार कारखान्यावर जाऊन बिलाची मागणी केली आहे मात्र बिल देण्यासाठी टाळाटाळ करण्यात येत आहे
साखर आयुक्त कार्यालयाकडे तक्रार करण्यात आली आहे त्याचाही काहीही उपयोग झाला नाही खरेतर शुगर केन कंट्रोल ऍक्टनुसार ऊस गाळप झाल्यानंतर 14 दिवसात बिल देणे बंधनकारक आहे मात्र गाळप हंगाम संपूण चार महिने झाले तरी अद्याप ऊस बिले दिलेली नाहीत सध्या शाळा, कॉलेज प्रवेश सुरू आहेत त्यातच शेतीची मशागतीची कामे सुरू आहेत यासाठी शेतकऱयांना हक्काचे पैसे मिळणे गरजेचे आहे मात्र हेलपाटे मारूनही बिले मिळालेली नाहीत त्यामुळेच तातडीने बिले द्यावीत अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल
यावेळी प्रवक्ते अनिल पवार भागवत जाधव पोपट मोरे वसंत सुतार जोतिराम जाधव आदींची भाषणे झाली. त्यानंतर कारखान्याचे धनंजय शिंदे धनंजय देशमुख व कविराज पाटील हे 28 जून पर्यंत सर्व बीलें देतो असे लेखी पत्र घेऊन आले 28 जून पर्यंत पैसे न दिल्यास कारखाना अध्यक्षच्या घरा समोर 29 जून पासून बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा खराडे यांनी दिला.