दिल्लीतील सरकारी शाळांना मेलेनिया ट्रम्प यांची भेट; शाळकरी विद्यार्थ्यांशी साधला संवाद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । डोनाल्ड आणि मेलेनिया ट्रम्प यांच्या दोन दिवशीय भारत दौऱ्यातील आजचा शेवटचा दिवस. आज सकाळपासून दोघेजण वेगवेगळ्या ठिकाणी भेटींसाठी गेल्याचं पाहायला मिळालं. मेलेनिया ट्रम्प यांनी प्रस्तावित नियोजनाप्रमाणे दिल्लीतील सरकारी शाळांना आज भेट दिली. दिल्लीतील जवळपास २-३ सरकारी शाळांना भेट देत त्यांनी शाळकरी मुला-मुलींशी संवाद साधला. शाळेतील मुलींनी त्यांनी मधुबनी पेंटिंगच्या तसवीरही भेट म्हणून दिल्या.

इथल्या मूला-मुलींची निसर्गाकडून शिकण्याची आणि सहज पद्धतीने एकमेकांसोबत मिसळण्याची कला मला फारच भावली अशा शब्दांत फर्स्ट लेडीने मुलांचं कौतुक केलं. येथील शाळांमध्ये शिकत असताना मुलं कोणत्या प्रकारचा आनंद लुटत असतील हे त्यांचे हसरे चेहरे पाहून मला समजत असल्याचंही मेलेनिया पुढं म्हणाल्या.

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.