दीड वर्षांत घरोघरी गॅस वाहिनी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे प्रतिनिधी | स्वप्निल हिंगे

नैसर्गिक वायु यांबाबतच्या सर्व माहिती संग्रह असलेल्या दिवाळी अंकाचे काल पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी बोलतांना मंत्री बापट यांनी सांगितले, की येत्या वर्षभरात अडीच लाख घरे सिलेँडरमुक्त करण्यासाठी आपण नक्कीच पाठपुरावा करणार आहोत.

तर महाराष्ट्र नैसर्गिक वायु महामंडळाचे संचालक राजेश पांडे हे म्हणालेत की, २०२० पर्यंत शहर सिलिंडर मुक्त करण्याचा महाराष्ट्र नैसर्गिक वायु महामंडळाचा प्रयत्न आहे, अशी माहिती याप्रकाशन सोहळ्याच्या वेळी दिली.

२०२० पर्यंत दोन कोटी घरांपर्यंत
यामाध्यमातून पोहचण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. प्रदूषणमुक्त शहरासाठी हा उपक्रम आवश्यक असून ५०० रूपयांमध्ये सोसायट्यांना गॅस उपलब्ध होणार आहे. सध्या यासाठी शंभर जिल्ह्यात काम सुरु असून त्यातील ४ जिल्ह्यातील कामे ‘एमएनजीएल’कडे देण्यात आली आहेत.

यावेळी एमएनजीएलचे संचालक संतोष सोनटक्के, पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघाचे अध्यक्ष सुहास पटवर्धन, खासदार अनिल शिरोळे आदि उपस्थित होते.

Leave a Comment