मुंबई | राज्यात दुध आंदोलन चांगलेच पेटले असून अनेक प्रमुख शहरांचा दुध पुरवठा रोखण्यात आंदोलन कर्त्यांना यश आले आहे. यापर्श्वभुमीवर काल राज्यकृषी मंत्री सदाभाऊ खोत यांनी ‘दुध आंदोलन राजकीय स्वार्थापोटी आणि आपणच कसे शेतकर्यांचे खरे नेते आहोत हे दाखवण्याकरता केले जात आहे’ अशी टीका आंदोलकांवर केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजु शेट्टी यांनी ‘दुध आंदोलन ही पुर्णपणे अराजकिय चळवळ असून महाराष्ट्रभरातील शेतकर्यांचा आमच्या आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळत असल्याचे’ सांगीतले आहे.
२०१९ च्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून हे आंदोलन आखण्यात आल्याचा टोला खोत यांनी नाव न घेता राजु शेट्टींवर लगावला होता. त्याला प्रत्युत्तर देताना शेट्टी यांनी आपली बाजू मांडली आहे. शेतकर्यांचे हित साधने हाच या दुध आंदोलनाचा प्रमुख हेतु आहे असे शेट्टी यांनी म्हटले आहे. सत्ताधारी एन.डी.ए. ने शेतकर्यांचा विश्वासघात केला आहे. त्यामुळे मी एन.डी.ए मधे सहभागी होण्याची मुळीच शक्यता नाही असेही शेट्टी पत्रकारांशी बोलताना म्हणाले आहेत.