पुणे : स्वतःच्या देशातील विद्यार्थ्यांच रक्षण करता येईना आणि इतर देशातील अल्पसंख्याकांचे रक्षण करण्याची इच्छा बाळगत आहात, अशा शब्दांत अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने(ज्युनिअर) मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. सोनालीने ट्विटरवरून मोदी सरकारवर टीका केली आहे. दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या घटनेवर सोनालीने अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना सोनालीने नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावर देखील भाष्य केले आहे. सोनाली कुलकर्णीचा धुराळा हा चित्रपट सध्या थेटरमध्ये सुरू आहे.
Can’t protect students in your own country and want to protect minorities from other countries!!!! #Irony #JNUViolence #jnuwewithyou
— Sonalee Kulkarni (@meSonalee) January 7, 2020
जेएनयूत विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचे देशभर पडसाद उमटत आहेत. विविध सेलिब्रिटी आपलं मत व्यक्त करून सरकारवर निशाणा साधत आहेत. या हल्ल्याच्या निषेधार्थ अभिनेत्री दीपिका पदुकोण जेएनयू येथे आंदोलन कर्त्या विद्यार्थ्यांसोबत सहभागी झाली आहे.