देशात आर्थिक आणीबाणी, मोदींनी घरगुती अर्थव्यवस्थेचे तुकडे केले – राहुल गांधी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम हॅलो महाराष्ट्र : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी देशातील आर्थिक परिस्थितीवरून मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. राहुल गांधी यांनी ट्विटरवरून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. देशात प्रचंड महागाई, प्राणघातक बेरोजगारी आणि घसरणारा जीडीपी यामुळे ‘आर्थिक आणीबाणी’ची स्थिती निर्माण झाल्याचे राहुल गांधी यांनी म्हंटले आहे.

 

मोदींनी घरगुती अर्थव्यवस्थेचे तुकडे केले

राहुल गांधी यांनी म्हंटले की, भाजीपाला, डाळी, खाद्यतेल, एलपीजी आणि अन्नपदार्थाच्या महागाईने गरिबांच्या तोंडचा घास हिरावून घेतला आहे. मोदींनी देशवासीयांच्या घरगुती बजेटचे तुकडे केले आहे. या ट्विटसोबत राहुल गांधी यांनी दोन बातम्या शेअर केल्या आहेत. १६ लाख रोजगार कमी झाले आहेत आणि वरून महागाईला सामोरे जावे लागत आहे, या अर्थाच्या बातम्या राहुल यांनी शेअर केल्या आहेत.

 

Leave a Comment