टीम HELLO महाराष्ट्र : दोन बेडकांचे धुमधदाक्यात लग्न लावण्याचा प्रकार मध्यप्रदेशातील छत्तरपूर गावात घडला आहे. पाऊस पडावा यासाठी दोन बेडकांचा विवाह सोहळा आयोजीत करण्यात अाला होता. बेडकांचा विवाहसोहळा हा धार्मिकविधीचा भाग असून असे केल्याने वर्षा देवता प्रसन्न होते व पाऊस पडतो अशी मध्य प्रदेशातील लोकांची श्रद्धा असल्याचे समजत आहे.
विशेष म्हणजे मध्य प्रदेशच्या मंत्री ललिता यादव यासुद्धा या विवाह सोहळ्यास उपस्थित होत्या. “आम्ही दुष्काळग्रस्त बुंदेलखंड भागात पाऊस पडावा यासाठी देवाकडे मागणी केली आहे. तसेच शेतकर्यांचे भले व्हावे म्हणुन देवाकडे प्रार्थना केली आहे”. असे विवाहस्थळी उपस्थित असणार्या बबर यांनी म्हटले आहे.