धुळे : जमावाकडून मारहान झाल्याने पाच जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना साक्री तालुक्यातील राईनपाडा गावात रविवारी घडली होती. लहान मुलांना पकडून नेत असल्याच्या संशयावरुन जमावाने पाच जणांना बेदम मारहान केली होती. पोलीसांनी शीघ्र तपासप्रक्रीया राबवावी अशी मागणी सर्वत्र होत होती. हाती आलेल्या माहीतीनुसार राईनपाडा प्रकरणामधे पोलीसांनी आत्तापर्यंत २३ जणांना अटक केली असल्याचे समजत आहे. धुळे हत्याकांडामुळे अख्का महाराष्ट्र हादरला असून समाजाच्या विविध स्तरांतून त्या घटनेचा निषेध व्यक्त केला जात आहे. धुळे दौर्यावर असलेले राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी ‘रेनपाडा प्रकरणात काही संशयीतांना अटक करण्यात आलेली असून दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल’ असे आश्वासन दिले आहे. सदरील प्रकार सोशल मिडीयावर पसरलेल्या अफवांमुळे घडला असून अशा अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये असे आवाहनही केसकर यांनी पत्रकारांशी बोलताना केले अाहे.