नरेंद्र मोदी आता ताजमहल देखील विकतील – राहुल गांधी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्यात असून आरोप प्रत्यारोपाच्या जोरदार फैरी झडत आहेत. पंतप्रधान नरेंद्र आणि काँग्रेस नेते राहुल गांधी देखील या प्रचाराच्या मैदानात आहेत. राहुल गांधींनी दिल्लीतील एका सभेत पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली.

राहुल गांधी म्हणाले, नरेंद्र मोदींनी मेक इन इंडियाचा चांगला नारा दिला पण एकही कारखाना उभारलेला नाही. ते इंडियन ऑईल, एअर इंडिया, हिंदुस्तान पेट्रोलियम, रेल्वे आणि अगदी लाल किल्ला असे सर्व काही विकत आहेत. ते कदाचित आता ताजमहाल देखील विकू शकतात.

दिल्लीच्या जंगपुरा येथे निवडणूक रॅलीला संबोधित करताना कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले की, आजकाल भाजप नेते देशभक्तीबद्दल बोलत असतात. सकाळ संध्याकाळ पाकिस्तानचा घोष करत असतात. मला पाकिस्तानमध्ये जाऊन हिंदुस्थानचा नारा देण्याची ताकद असलेल्या एका भाजपा नेत्याला दाखवा.

नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात LIC मध्ये असणाऱ्या समभागाची विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारी विमान कंपनी एअर इंडिया विक्रीसाठी काढण्यात आली आहे. तसेच काही खाजगी रेल्वे चालू करण्यात आल्या आहेत. मोदी सरकारच्या या धोरणांच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टिका केली. एअर इंडिया, हिंदुस्तान पेट्रोलियम, रेल्वे आणि अगदी लाल किल्ला असे सर्व काही मोदी सरकार विकत आहे. आता ते कदाचित ताजमहाल देखील विकतील अशी टीका राहुल गांधी यांनी केली. दिल्लीतील एका प्रचार सभेत ते बोलत होते.