चंदीगड | विधान सभेच्या निवडणुकांदरम्यान सतत काढलेल्या मोर्च्यामध्ये भाषण दिल्याने काँग्रेस नेते नवजोत सिद्धू यांचे आरोग्य चांगलंच खालावल आहे. योग्य ती खबरदारी न घेतल्यास आवाज जाऊ शकतो असं डाॅक्टरांनी सांगितलं आहे. तसेच ३ ते ५ दिवस आराम करण्याचा सल्ला दिला आहे.
डॉक्टरांनी सांगितल्यानुसार नवजोत सिंह सिद्धू ला आवाज जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. सतत दिलेल्या भाषणामुळे सिद्धू यांचा आवाज जाण्याच्या पातळीपर्यंत पोहचला आहे. सतत दिलेल्या भाषणामुळे सिद्धू चे वोकल कॉर्ड्स ला हानी पोहचली आहे. डॉक्टराचं म्हणणं आहे की जर सिद्धू जास्त बोलले तर त्यांचा आवाज जाऊ शकतो. सिद्धू ने एकापाठोपाठ 70 मोर्चे काढले होते.
मिळालेल्या सूत्रानुसार, सिद्धू च श्वसनाचा अभ्यास सत्र सुरू आहे. सततच्या हेलीकॉप्टर आणि विमान प्रवासामुळे त्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम झाला आहे. डॉक्टरांनी सांगितले की परिस्तिथी गंभीर आहे.