नांदेडचे उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकर याना अटक करण्याचे आदेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नांदेड प्रतिनिधी | राज्यभर गाजलेल्या धान्य घोटाळ्या प्रकरणी नांदेडचे उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकर यांना अटक करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. यासोबतच संतोष वेणीकर सापडत नसतील तर त्यांची संपत्ती जप्त करण्याचे आदेश खंडपीठाने सीआयडीला दिले आहेत. या न्यायालयाच्या आदेशाने जिल्ह्यात एकाच खा;लेबल उडाली आहे. 

न्यायालयाच्या आदेशामुळे महसूल कर्मचारी आणि अधिकाऱ्यांमध्ये एकाच खळबळ उडाली आहे. कोट्यवधी रुपयांचे शासकीय धान्य काळ्या बाजारात विकल्याबद्दल जुलै २०१८ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

खंडपीठाने म्हटले आहे की जर विनीकर सापडत नसतील तर त्यांचे पोस्टर लावावेत तसेच त्यांची संपत्ती जप्त करावी. सामाजिक कार्यकर्ते असलेले मोहम्मद रफीक अब्दुल शकुर यांनी या प्रकरणी न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर त्यांच्यावर विविध प्रकारे दबाव आणण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे ही बोलले जात होते. तसेच ते परभणी मध्ये असताना त्यांना जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली होती. या प्रकरणात आतापर्यंत अजय बाहेती, राजू पारसेवार, ललीतराज खुराणा, प्रकाश तापडीया हे गर्भश्रीमंत व्यापारी अद्याप तुरुंगात आहेत. त्यासोबतच महसूल विभागाचे चार कर्मचारीही अटकेत आहेत.

Leave a Comment