नाशिक प्रतिनिधी। नाशिक जिल्ह्यात जोरदार व मुसळधार पाऊस पडत असल्यान नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या आस्वली गावाजवळील रेल्वे पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळ सर्व गाड्या इगतपुरी ते आसनगाव व वाशिंद स्थानकात थांबवण्यात आल्यात. त्यामुळं इगतपुरी ते नाशिक रेल्वे सेवा ठप्प झाली आहे.
शहर व परिसरात जोरदार पाऊस झाला. दुपारी तीन वाजेनंतर शहरासह उपनगरीय भागांमध्ये ढग दाटून आल्याने जणू अंधार पडला होता. काही मिनिटांतच दमदार सरींचा वर्षाव सुरू झाल्यान रस्त्यांवरून पाण्याचे पाट वाहिले. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत पाऊस सुरू असल्यान सायंकाळी घरी परतणाऱ्या शाळकरी मुलांचे हाल झालेत.
मागील २ दिवसांपासून शहराच्या वातावरणात उकाडा जाणवतोय. बुधवारीही सकाळपासून दुपारपर्यंत उष्मा कायम होता. दुपारी ढगाळ हवामान तयार झाल्यानंतर थंड वारा सुटला अन सरींच्या वर्षावाला सुरूवात झाली. उपनगर, द्वारका, जुने नाशिक, पंचवटी, वडाळागाव, इंदिरानगर, पाथर्डी, सातपूर या उपनगरीय भागात जोरदार सरी कोसळल्या. देवळाली कॅम्प, भगूर परिसरात सुमारे तासभर जोरदार पाऊस झाला सुमारे दीड तास पावसान या उपनगरांना झोडपल.