नितीन गडकरींनी केली महत्वाची घोषणा

thumbnail 1531920881311
thumbnail 1531920881311
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली | भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन मोठी घोषणा केली आहे. गडकरी यांनी पत्रकार परिषदेत केंद्राने राज्याला देऊ केलेली मदत जाहीर केली आहे. महाराष्ट्रातील रखडलेले सिंचन प्रकल्प मार्गी लागावे यासाठी केंद्र सरकारने भरीव मदत जाहीर केली आहे. या मदतीतून राज्यातील ९१ प्रकल्प मार्गी लागणार आहेत.
केंद्र सरकारच्या वतीने १३,६५१ कोटी रुपयांची भरीव निधी राज्यातील रखडलेल्या प्रकल्पांना देण्यात येणार आहे. तसेच राज्यातील १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांना विशेष पॅकेज जाहीर करत असल्याचे गडकरींनी घोषित केले आहे. राज्यातील रखडलेले प्रकल्प मार्गी लागल्यावर ३ लाख ७७ हजार हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. राज्याची सिंचनाची स्थिती पंजाब हरियाणा राज्याच्या तुलनेत फारच कमी आहे म्हणून हा निधी मंजूर केला असल्याचे गडकरी यांनी सांगितले आहे. बळीराजा जलसिंचन योजना या नावाने ही योजना राज्यात राबवली जाणार आहे.