पंतप्रधान मोदींनी मागितलं बर्थ डे गिफ्ट ; म्हणाले की बर्थडे गिफ्ट म्हणून मला ‘या’ गोष्टी द्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 सप्टेंबर रोजी आपला 70वा वाढदिवस साजरा केला.जगभरात एक पावरफुल व्यक्ती म्हणून मोदींकडे बघितले जाते. जगभरातून अनेक चाहत्यांनी तसेच राजकीय नेत्यांनी मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सोशल मीडियावरही मोदींच्या वाढदिवसानिमित्त ट्रेंड सुरु होता. अनेक चाहत्यांनी मोदींना वाढदिवसानिमित्त काय गिफ्ट द्यायचं असा प्रश्नही विचारला होता. मोदींनी चाहत्यांच्या त्याच प्रश्नाचं उत्तर देत, त्यांना काय गिफ्ट हवं, याची संपूर्ण लिस्टच सांगितली आहे. 

पंतप्रधांनी ट्विट करत वाढदिवसाचं गिफ्ट मागितलं आहे. ‘अनेकांनी मला वाढदिवसानिमित्त काय गिफ्ट हवं याची विचारणा केली होती, मी मला हव्या असलेल्या गोष्टी सांगतो. सर्वांनी मास्क घाला आणि ते योग्यरित्या घाला. सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा. दो गज की दूरी नेहमी लक्षात ठेवा. गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा. स्वत:ची इम्युनिटी वाढवा आणि आपण सर्व मिळून आपलं जग स्वस्थ-निरोगी बनवूया’ असं ट्विट करत मोदींनी हेच गिफ्ट सर्वांकडे मागितलं आहे.

मोदींनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिलेल्या सर्वांचे आभार मानले आहेत. ‘सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांमुळे मला जनतेची सेवा करण्याची आणि जनतेचं जीवनमान सुधारण्याच्या दिशेने काम करण्याची शक्ती मिळत असल्याचंही मोदी म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’