परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे
पोलीस स्थापनादिनाच्या निमित्ताने आज परभणी येथील पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर एका विशेष सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या सोहळ्यामध्ये सुरवातीला पोलीस दलातर्फे पथसंचलन करून सर्वांचे लक्ष वेधण्यात आले.
विशेष म्हणजे तरुण पिढीला पोलीस दल, वाहतूक शाखा यांच्या कामा विषयी माहिती मिळावी. यासाठी या सोहळ्याला शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना पोलिस दलाकडून विशेष निमंत्रित करण्यात आलं होतं.
यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना वाहतूक शाखा, डॉग स्कॉड आणि पोलिस दलाकडून वापरण्यात येणाऱ्या, विविध शस्त्रास्त्रांची माहिती देण्यात आली. सोबत जनजागृतीपर पुस्तिकेचे, पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते, विद्यार्थ्यांना वितरण करण्यात आले. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी, पोलिस अधिकारी आणि अधीक्षक यांच्याकडून आपल्या शंकांचं निरसन करून घेतलं.