परभणी प्रतिनिधी। गजानन घुंबरे
यंदाच्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी पेरलेली सोयाबीन न उगवल्याच्या अनेक तक्रारी कृषी विभागात दाखल झाल्या होत्या. यातील आता सहा कंपन्याचे परवाने संचालक कृषी आयुक्तालय, पुणे यांनी रद्द केला आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील बियाणे विक्रेत्यांनी आता या कंपन्यांचे बियाणे भविष्यात विकू नये असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील बियाणे विक्रेत्यांनी मे. मोहरा सिडस इंदोर मध्यप्रदेश, मे. रवी सिडस कॉर्पोरेशन गांधीनगर गुजरात, मे.निलेश ॲग्रो सिडस मध्यप्रदेश, मे. अशियन सिडस प्रा. लि. इंदोर मध्यप्रदेश, मे.बालाजी सिडस ॲड अग्रीटेक खांडवा मध्यप्रदेश, मे. बन्सल सिडस खांडवा मध्यप्रदेश या सहा कंपनीसोबत बियाणे खरेदी विक्रीचे व्यवहार करु नये. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, परभणी यांनी केले आहे.
कृषी निविष्ठा परवाना अधिकारी तथा कृषी संचालक कृषी आयुक्तालय पुणे यांनी विविध सोयाबीन विक्रेते कंपनीच्या त्यांच्या प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने मागील महिन्यात १८ऑगस्ट रोजी प्रत्यक्ष सुनावणी घेऊन वरील सहा कंपन्यांना बियाणे कायदा १९६६ च्या खंड ६ व ७बियाणे नियम १९६८ चे नियम १३व बियाणे नियंत्रण आदेश १९८३ च्या कलम ८ (अे) व १८ (२) चा भंग केल्यामुळे परवाना रद्द केला आहे, असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी परभणी यांनी कळविले आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’