टीम हॅलो महाराष्ट्र : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेचा पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झाला. या पहिल्याच सामन्यात भारताला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. नाणेफेक गमावल्यानंतर टीम इंडिया प्रथम फलंदाजीस आली आणि 49.1 षटकांत 255 धावांवर बाद झाली. अशाप्रकारे ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 256 धावांचे लक्ष्य मिळाले. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने कोणतीही विकेट न गमावता 31.4 षटकांत 214 धावा केल्या आहेत. अरॉन फिंचने 91 धावा केल्या तर डेव्हिड वॉर्नरने शतकी खेळी करत 104 धावा केल्या.
टीम इंडिया 255 धावांवर ऑलआऊट झाली
टीम इंडिया 49.1 षटकांत 255 धावांवर बाद झाली. अशाप्रकारे ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 256 धावांचे लक्ष्य मिळाले. भारताकडून शिखर धवनने सर्वाधिक 74 धावा केल्या तर केएल राहुलने 47 धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने सर्वाधिक तीन गडी बाद केले. कमिन्स आणि रिचर्डसन यांना प्रत्येकी दोन यश मिळाले. झम्पा आणि एश्टनला प्रत्येकी एक विकेट मिळाली.