पाकिस्तानमधील अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अत्याचारा विरोधात आवाज उठवा; पंतप्रधान मोदींचे आंदोलन कर्त्यांना आवाहन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

तुमकुरू: पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या कर्नाटक दौर्‍यावर आहेत. तुमकुरु येथे श्री शिवकुमार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ बांधल्या जाणाऱ्या संग्रहालयाच्या भूमिपूजन प्रसंगी पंतप्रधानांनी भाषण केले. ते म्हणाले की, जे लोक आज भारतीय संसदेविरोधात आंदोलन करीत आहेत त्यांना मला सांगायचे आहे की, आज आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची ही कारवाई उघडकीस आणण्याची गरज आहे. जर तुम्हाला आंदोलन करायचे असेल तर गेल्या 70 वर्षात पाकिस्तानच्या कारनाम्यांविरोधात आवाज उठवा. तुम्हाला जर घोषणा द्याव्या लागतील तर पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याकांवर ज्या प्रकारे अत्याचार होत आहेत त्या विरोधात घोषणा द्या.

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात देशभर आंदोलने केली जात आहेत. त्या आंदोलन कर्त्यांना पाकिस्तानमधील अल्पसंख्यांकावर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध आवाज उठविण्याचे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले आहे.

तत्पूर्वी, विमानतळावर पंतप्रधानांचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा, केंद्रीय मंत्री डी.व्ही. सदानंद गौडा, प्रल्हाद जोशी आणि राज्य महसूलमंत्री आर. अशोक यांनी मोदींचे स्वागत केले. पंतप्रधान शिवकुमार स्वामीजींच्या स्मारक संग्रहालयाचे शिलान्यास करण्याबरोबरच डीआरडीओ युवा वैज्ञानिक प्रयोगशाळा देशाला समर्पित करणार असून नरेंद्र मोदी शुक्रवारी बंगळूरमधील कृषी विज्ञान विद्यापीठात 107 व्या भारतीय विज्ञान कॉंग्रेसचे उद्घाटन देखील करतील.

Leave a Comment