पाथरी विधानसभा मतदारसंघ काबीज करण्यासाठी भूमिपुत्रांची फिल्डींग

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे 

ऑक्टोबर मध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने पाथरी विधानसभा मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग आला आहे. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात दोन वेळा सुरुंग लावण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक वेळ अपक्ष यशस्वी झालेले आहेत. 1990 पासून सलग तीन वेळा शिवसेनेने माजी आमदार हरिभाऊ लहाने यांच्या रूपाने हॅट्रिक केली होती. 2004 मध्ये राष्ट्रवादीकडून विधान परिषदेचे विद्यमान आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी शिवसेनेचे विजयी घोडदौड रोखली होती . 2009 साली पाथरी विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना करण्यात आली त्यापूर्वी सेलू तालुका व पाथरी तालुका मिळून विधानसभा मतदारसंघ होता. पुनर्रचनेनंतर मात्र शेजारील शिंगणापूर मतदारसंघ पाथरी विधानसभेत विसर्जित करण्यात आला. त्यामुळे मानवत, सोनपेठ संपूर्ण तालुके तर परभणी तालक्याूतील काही गावे असा मिळून नवीन पाथरी विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आलाय. मतदारसंघात तीनशे चौऱ्यान्नव (394) मतदान केंद्र असुन तीन लाख सत्तेचाळीस हजार चारशे एकावन्न (347451) मतदार आहेत. यामध्ये एक लाख ऐंशी हजार नऊशे ऐक्यान्नव (180991) पुरुष मतदार तर एक लाख सहासष्ठ हजार चारशे अठ्ठावन्न (166458) महिला मतदार तर इतर दोन मतदार आहेत. यामध्ये नुकत्याच नुतन नोंदणी केलेल्या चार हजार चौऱ्याहत्तर (4074) नुतन मतदारांची भर पडली आहे .

पुनर्रचनेनंतर मात्र कोणत्याही एका पक्षाला सातत्याने विजय घेता आलेला नाहीये. 2009 साली मीरा रेंगे यांच्या रूपाने शिवसेनेला विजय मिळवता आला परंतु 2014च्या निवडणुकांमध्ये अपक्ष उमेदवार मोहन फड यांनी सर्वच पक्षांना धूळ चारत विजय मिळवला. यावेळी अपक्ष निवडून आलेले मोहन फड यांना एकोणसतर हजार ऐंक्याऐंशी हजार. (६९०८१ ) तर दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुरेश वरपूडकर यांना पंचावन्न हजार सहाशे बत्तीस ( ५५,६३२) मते मिळाली होती .यावेळी सर्वच पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या होत्या.

2014 नंतर आज पर्यंत बरीच आता राजकीय समीकरणे बदलली आहेत. प्रत्येक वेळी आयात केलेला उमेदवार पाथरी विधानसभा मतदार संघावर राज्य करत असल्याने त्याला स्थानिक लोकांचे प्रश्न समजत नसल्याची मतदार संघातील लोकांची भावना आहे .त्यामुळे आता या निवडणुकीमध्ये भूमिपुत्रांनी किल्ला लढवण्याचे ठरवल्याचे दिसत आहे. पाथरी शहर व तालुका सोडले तर मानवत सोनपेठ व परभणी तालुक्यातील मतदारसंघात समाविष्ट असलेल्या गावांचा विकास न झाल्याने, कापुस उत्पादकांचा मतदारसंघ असताना मानवत येथे टेक्सटाईल मिल तेरा वर्षापासून गोदावरीवरील तारूगव्हाण येथे असणारा उच्च पातळी बंधाऱ्याचे काम रखडले असल्याने गोदावरी किनाऱ्यावरील गावांचा सिंचनाचा मोठा प्रश्न प्रलंबित आहे.

पाथरी सोनपेठ रस्त्याची दुरवस्था झाल्याने ऊस उत्पादक शेतकरी, प्रवाशांचे हाल अजूनही थांबलेले नाहीत, शिक्षण, आरोग्य, स्थानिक ठिकाणी मोठे उद्योग व्यवसाय नसल्याने मतदारसंघातील नागरिकांना पर जिल्ह्यामध्ये कामासाठी स्थलांतर करावं लागतं यामुळे रोजगाराचाही प्रश्न सुटलेला नाही. जायकवाडीच्या पाण्यामुळे व गोदावरी बंधाऱ्यावर बांधण्यात आलेल्या उच्च पातळी बंधारा बंधाऱ्यामुळे मतदार संघ बऱ्याच अंशी सिंचनाखाली येतो परंतु सातत्याने पडणारा दुष्काळ व शेतीमाल प्रक्रिया उद्योग उभारनी न झाल्याने बहुसंख्य शेतीवर अवलंबून असणाऱ्या येथील लोकांंच्यासमोर अनंत समस्या उभ्या राहिलेल्या आहेत, त्या सोडवणारा व विकासाची दृष्टी असणारा स्थानिकांना उमेदवार व आमदार हवा आहे. अशी मतदारांची भावना आहे.

विद्यमान आमदार मोहन फड निवडून आल्यानंतर शिवसेना व नाराजी नाट्यानंतर भाजप असा त्यांचा पाच वर्षाचा प्रवास आहे .पाच वर्षांमध्ये त्यांच्याकडून मतदारसंघातील रस्ते व त्यांनी केलेले आरोग्य सेवेचे काम त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे पण युतीच्या तडजोडी मध्ये हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्याने येणारी विधानसभा निवडणूक भाजप कडून लढवण्यासाठी त्यांना हा मतदारसंघ भाजपसाठी सोडवून घ्यावा लागणार आहे. जिंतुर व गंगाखेड मतदारसंघ भाजपसाठी सोडवण्यास स्थानिक नेते प्रयत्नशील असल्याने पाथरी च्या रुपाने तिसरा मतदारसंघ मिळणे याची धुसर शक्यता आहे. त्यामुळे विद्यमान आमदार मोहन फड हे परत अपक्ष लढणार हे निश्चित आहे.

आघाडी कडून काँग्रेस पक्षाला हा मतदारसंघ सुटलेला असल्याने माजी राज्यमंत्री सुरेश वरपुडकर दावेदार आहेत. मागील दोन वर्षापासुन त्यांनी या मतदारसंघात संपर्क वाढवला आहे. तर त्यांच्या सुनबाई प्रेरणा वरपुडकर यांनीही आरोग्य सेवेच्या माध्यमातून गावेगावी भेटी दिल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची या मतदारसंघात चांगली बांधणी आहे. स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये मोठे बळ त्यांच्यापाशी असुन कार्यकर्त्यांची मोठी फळी येथे आहे .विधानपरिषदेचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांचे खंबीर नेतृत्व जमेची बाजु आहे. 2014 मध्ये आघाडी तुटल्याने राष्ट्रवादी पक्षाने कॉंग्रेस पक्षाच्या विरोधात दोन हात केले होते पण काँग्रेसने अधिकचे मताधिक्य मिळवले होते.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार राजेश विटेकरांना या मतदार संघातून मताधिक्य मिळाल्याने राष्ट्रवादीकडून जागेवर दावा केला जातो आहे. राजेश विटेकरांना संधी द्यावी अशी स्थानिक कार्यकर्त्यांची मागणी आहे. तसे झाल्यास राजेश विटेकर व जि.प उपाध्यक्षा भावनाताई नखाते राष्ट्रवादी पक्षाकडून इच्छुक आहेत.
शिवसेनेचा गड असल्याने शिवसेनेकडून यावेळी स्थानिक भूमिपुत्रांची इच्छूक म्हणून दावेदारी आहे त्यामध्ये जिल्हाप्रमुख सुरेश ढगे, उपजिल्हाप्रमुख रविंद्र धर्मे, पाथरी तालुका प्रमुख मुंजाभाऊ कोल्हे, मानवत हून विष्णू मांडे, डॉ.जगदीश शिंदे यांचा समावेश आहे. डॉ.जगदीश शिंदेनीे मागील दिड वर्षापासुन इच्छूक म्हणुन मतदारसंघात जनसंपर्क वाढवला होता . मागील आठ दिवसात मात्र यात दोन नावे आणखी जोडली गेले आहेत. कान्सुर गावचे भूमिपुत्र डॉ. राम शिंदे व समृध्दी साखर कारखान्याचे चेअरमन सतीष घाडगे रुपाने इच्छूकात भर पडली आहे. डॉ.राम अच्युतराव शिंदेयांच्या पारड्यात परभणीचे खासदार संजय जाधव यांचे वजन असल्याची चर्चा असुन मातोश्री वरुन आदेश मिळण्याची शक्यता असल्याने डॉ.राम शिंदे नी मतदारसंघात भेटीगाठीचा धडाका लावला आहे.

या सगळ्यामध्ये नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकी मध्ये वंचित बहुजन आघाडी ला मताचा मोठा टक्का मिळालेले पाथरी मतदारसंघातील होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये वंचित आघाडी फॅक्टर प्रभावी ठरण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी कडून लढण्यास इच्छुकांची भाऊगर्दी आहे , समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष व माजी जि.प. सदस्य चक्रधर उगले यांच्यासह सुनील बावळे पाटील, विलास बाबर , वंचित बहुजन आघाडी कडून इच्छुक आहेत .याशिवाय टि.डी. रुमाले, मो. इल्यास अकबर मनियार, अरुण ढवळे यांच्यासह दहा ते पंधराजणांनी मुलाखती दिल्या असुन विधानसभा लढण्यास इच्छूक आहेत.

इच्छुकांची भाऊगर्दी असली तरी युती-आघाडी यांच्या निर्णयानंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. सोबत विधानपरिषदेचे आमदार बाबाजानी दुर्राणी व शिवसेनेचे परभणीचे खासदार संजय जाधव यांचे वजन कोणाच्या पारड्यात पडत यावरून विधानसभेचा उमेदवार तर शेवटी सुज्ञ मतदारच आमदार ठरवणार आहेत.

Leave a Comment