बंगळुरू : पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसीय कर्नाटक दौऱ्यावर आहेत. दौऱ्यादरम्यान त्यांनी तुमकूर येथे कृषी कर्मण पुरस्काराचं वितरण करण्यात आले. त्यावेळी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या लोकांचा सत्कार करण्यात येत होता. एका महिलेचे नावही पुरस्कारासाठी पुकारण्यात आले. महिला व्यासपीठावर आल्यानंतर मोदींनी या महिलेला हातजोडून अभिवादन केले. त्यानंतर तिला प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात आले. प्रशस्तीपत्रक घेतल्यानंतर ही महिला मोदींना नमस्कार करण्यासाठी खाली झुकली. मात्र त्यावेळी पंतप्रधान मोदींनी तिला अडवलं आणि स्वत: तिच्या पाया पडण्यासाठी झुकले.
मोदी जे बोलतात ते आचरणात उतरवतात
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या कृतीवर केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी भाष्य केले. त्यांनी म्हंटले की,’प्रत्येक आई आणि मुलीचा सन्मान. बंगळूरूमध्ये जेव्हा महिला मोदींना नमस्कार करण्यासाठी झुकली. तेव्हा मोदींनी तिला अडवलं आणि स्वत: पाया पडण्यासाठी झुकले. हा व्हिडीओ पाहून मोदी जे बोलतात ते आचरणात उतरवतात’.