पिंपरी चिंचवड | पुण्याच्या पोलीस आयुक्तालयावरील अतिरिक्त भार कमी करण्यासाठी नव्याने तयार करण्यार येणाऱ्या पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. पुणे पोलीस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रात असलेला भाग हा ३० किलोमीटर पेक्षा अधिक होत असल्याने तसेच पोलीस प्रशासनाला अडथळा निर्माण होत असल्याने नव्या पोलीस आयुक्तालयास गृह खात्याने मान्यता दिली.
भारतीय पोलीस सेवेतील मकरंद रानडे यांची पिंपरी चिंचवडच्या पहिल्या पोलीस आयुक्त पदी नेमणूक झाली आहे. तर नम्रता पाटील आणि विनायक ढाकणे यांची उपायुक्त पदी निवड करण्यात आली आहे.
पिंपरी चिंचवड मधील महात्मा फुले शाळेचा भूखंड पोलीस आयुक्तालयासाठी आरक्षित करण्यात आला होता.आयुक्तालयाचे काम अंतिम टप्प्यात असून १५ ऑगस्ट रोजी आयुक्तालयाचे उदघाटन अपेक्षित आहे. पिंपरी, चिंचवड, निगडी, वाकड,भोसरी, भोसरी एमआयडीसी, हिंजवडी चिकली, दिघी, देहूरोड, आळंदी, तळेगाव दाभाडे, तळेगाव एमआयडीसी, चाकण,सांगवी आशा १५ पोलिस स्टेशनचा समावेश नव्या आयुक्तालयात करण्यात येणार आहे.