पीएनजी ज्वेलर्स तर्फे पिंपळे सौदागरमध्ये दुसरे फ्रँचायजी स्टोअर सुरू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे | औंधमधील पहिल्या फ्रँचायजी स्टोअरच्या यशानंतर अवघ्या 15 दिवसातच पीएनजी ज्वेलर्सने दुसरे फ्रँचायजी स्टोअर पिंपळे सौदागर येथे सुरू केले आहे. या स्टोअरचे उद्घाटन प्रसिध्द बॉलीवूड अभिनेत्री करिष्मा कपूर ह्यांच्या हस्ते पार पडला. पिढ्यानपिढ्या आपल्या ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करणार्‍या पीएनजी ज्वेलर्सच्या या नवीन स्टोअरमध्ये सोने,चांदी व हिर्‍याच्या दागिन्यांची अखंड श्रेणी उपलब्ध असेल.

या फ्रँचायझी स्टोअरमध्ये आजच्या काळातील महिलांसाठी क्लासिक तसेच समकालीन डिझाईनचे दागिने उपलब्ध करण्यात आले आहेत.हे स्टोअर पिंपळे सौदागर येथील शिवार चौक या महत्त्वाच्या ठिकाणी असून हे विकसित निवासी परिसर असल्याने शहरातील नव्या रहिवाशांना हे ठिकाण राहण्यासाठी आकर्षित करेल.म्हणून पीएनजी ज्वेलर्सला आपला ग्राहकवर्ग वाढविण्यासाठी स्टोअरचे हे ठिकाण योग्य आहे.

या स्टोअरचे स्वरूप पीएनजी ज्वेलर्सच्या इतर स्टोअर्सप्रमाणेच असून ब्रँडचा उच्च गुणवत्ता व मानकांचा वारसा पुढे नेईल.प्रत्येक फ्रँचायजी स्टोअरमध्ये पीएनजी ज्वेलर्स तर्फे एक व्यवस्थापक उपलब्ध असणार आहे.ज्यामुळे गुणवत्तेचे प्रमाण व या जागतिक ब्रँडचे नावलौकिक जपण्यासाठी आवश्यक त्या पध्दतीने कामकाज कार्यान्वित होईल.प्रत्येक फ्रँचायजी स्टोअरचे व्यवस्थापन पीएनजीच्या उच्चतम दर्जाप्रमाणेच होणार आहे.

याप्रसंगी बोलताना पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ म्हणाले की, आमच्या औंध येथील पहिल्या फ्रँचायजी स्टोअरच्या यशाने आम्हाला अत्यंत आनंद झाला आहे आणि आता दिवाळी आधी आम्ही दुसर्‍या फ्रँचायजी स्टोअर सुरु करण्यासाठी अत्यंत उत्सुक आहोत. आमच्या ग्राहकांना खरेदीचा सर्वोत्तम अनुभव देण्याचा प्रयत्न पीएनजी नेहमीच करत आले आहे.आम्हाला केवळ भारतातूनच नव्हे तर परदेशातून देखील फ्रँचायजी स्टोअरसाठी मागणी येत आहे. याच प्रकारे प्रतिसाद येत राहिला तर आम्हाला आशा आहे की, पुढील 2 वर्षात 20 स्टोअर्स सुरू करण्याचे आमचे लक्ष्य आम्ही सहजरित्या पार करू शकू. पुण्यातील दुसरे फ्रँचायजी स्टोअर हे आमच्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा असून पीएनजी ज्वेलर्ससाठी शहराचे महत्व अधोरेखित करते.

Leave a Comment