पुण्यातील पाटील इस्टेट आगीच्या लोटात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे | स्वप्निल हिंगे

शहराच्या मध्यवर्ती भागात असणार्या पाटील इस्टेट झोपडपट्टी परिसरात आज दुपारी अचानक आग लागली. आगीने घेतलेल्या रौद्र रुपाने आतापर्यंत 100 हून अधिक झोपड्या जळून खाक झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. अग्निशमन दलाच्या 40 गाड्यांचा ताफा आग विझविण्यासाठी तैनात करण्यात आल्या असून त्या आग विझवण्याचा अतोनात प्रयत्न करत आहेत.

सहा ते सात सिलेंडरचे स्फोट झाल्यामुळे आग आणखी भडकली असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पाटील झोपडपट्टीतील गल्ली क्रमांक 3 मधे दुपारी एकच्या सुमारास ही आग लागली असल्याचे समजत आहे. आगीचे महाकाय रूप पाहता पुणे, पिंपरी-चिंचवड आणि आसपासच्या परिसरातून अग्निशमन दलाच्या गाड्या मागवाव्या लागल्या. घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाल्यामुळे अग्नीशमन दलाला काम करण्यात अडथळा येत आहे. अग्निशमन दलाच्या वाहनांना झोपडपट्टीत जाण्यास अडथळे येऊ नये यासाठी वाहतूक रोखण्यात आली आहे .स्थानिक पोलीस घटनास्थळावरील गर्दीला आवरण्याचा प्रयन्त करीत आहेत.

दोन दिवसांपूर्वी गल्ली नं 5 मधे अशी आग लागली होती. तेव्हा 2 घरे जळाली होती. झोपडपट्टीतील सिलेंडरच्या स्फोटा मूळे आग लागली असावी याची दाट शक्यता आहे. पाटील इस्टेट झोपडपट्टीत 400 घरे आहेत.संपूर्ण झोपडपट्टी रिकामी केल्याची माहिती आहे.

Leave a Comment