पुणे प्रतिनिधी | विविध मागण्यासाठी महसूल कर्मचाऱ्यांनी गुरुवारपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला असून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरु केले आहे. सहा वर्षाचा कालावधी उलटूनही शासनान महसूल कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नसल्याने त्यांनी गुरुवारपासून बेमुदत संप पुकारला आहे.
शासनान ६ वर्षांचा कालावधी उलटूनही महसूल कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत. त्याचबरोबर ज्या मागण्या तत्वत: मान्य केल्या होत्या त्यासंदर्भात कोणताही शासन निर्णय प्रसिद्ध केला नाही. त्यामुळे नाईलाजास्तव जुलै महिन्यापासून टप्प्याटप्यान आंदोलनास सुरुवात केली. त्यानुसार गुरुवारपासून राज्यातील सर्व महसूल कर्मचारी, अव्वल कारकून, लिपिक, वाहनचालक, शिपाई, कोतवाल बेमुदत संपावर जाणार असून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत आहेत.
या संपामुळे महसूल विभागाच कार्यालयीन कामकाज ठप्प झाल आहे. महसूल कर्मचारी संघटनेचे राज्य पदाधिकारी दिशा ठरवत नाहीत तोपर्यंत संप सुरू राहील, अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.