पुरंदर विमानतळाचे लवकरच होणार भूसंपादन

thumbnail 1531977501214
thumbnail 1531977501214
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे | संरक्षण विभागाच्या परवानगीत वर्षभर अडकून पडलेल्या पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनाचा मार्ग मोकळा झाला आहे. येत्या काही दिवसात पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जमिनीचे संपादन करण्यात येईल. छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ पुरंदर तालुक्यात होणार आहे.

विमानतळाच्या भूसंपादनाचा मोबदला म्हणून दिली जाणाऱ्या रक्कमे साठी सरकारने २ हजार ७१३ कोटी आणि फळबागा विहिरी यासाठी ८०० कोटी अशी ३ हजार ५१५ कोटी रुपयांची रक्कम राखून ठेवण्यात आली आहे.

कोणत्या गावातील किती जमीन झाली आहे आरक्षित.
पीएमआरडी च्या कार्यक्षेत्रातील गावे
वनपुरी-३३९हेक्टर
कुंभारवळण-३५१हेक्टर
उदाचीवाडी-२६१हेक्टर

जमीन आरक्षणाची इतर गावे
एकतपूर-२७१ हेक्टर
मुंजवडी-१४३ हेक्टर
खानवडी-४८४ हेक्टर
पारगाव-१०३७ हेक्टर

अशी एकूण २ हजार ८३२ हेक्टर जमीन विमानतळासाठी आरक्षित करण्यात आली आहे.विमानतळ निर्मिती साठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीला विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा देण्यात आला आहे.