मुंबई | आजोबा आणि नातवाच्या नात्यावर आधारित असलेला पुष्पक विमान चित्रपट आज प्रदर्शित होतो आहे. मोहन जोशी आजोबाच्या तर सुबोध भावे नातवाच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. आजोबा नातवाच्या भेटी साठी कसे कासावीस होतात..रोज एसटी स्टँडवर जाऊन मुंबईवरून आलेल्या एसटी बसमध्ये नातू आलाय का हे बघायला जातात..मग नातू आजोबाला घेऊन मुंबईला जातो तिथं त्यांचे गावठी स्वरूप आणि त्यातून नातवाला करावी लागणारी दोरी वरील कसरत अशा दृश्यांनी चित्रपट तयार झाला आहे.
नातू लहान असताना आजोबाला प्रश्न विचारतो “आजोबा नातू म्हणजे काय रे?” या प्रश्नावर दिलेले उत्तर काळजाला हात घालून जाणारे आहे. नातू म्हणजे आजोबाचा शेवटचा मित्र आणि आजोबा म्हणजे नातवाचा पहिला मित्र. नात्यांचा बंध उलघडणारा असा हा पुष्पक विमान चित्रपट अद्वितीयच आहे.