पृथ्वीराज चव्हाणांना सोडून गेलेले सूर्याजी पिसाळ, शिवराज मोरेंचा आरोप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

शिवाजी महाराजाच्या काळात एक पिसाळ झाला, मात्र आज लोकशाहीच्या काळात कराड दक्षिमध्ये एक सुर्याजी पिसाळ झाला, अरे गेला तर गेला मात्र येथे आमच्याकडे मावळे आहेत, असा टोला नाव न घेता आ. आनंदराव पाटील यांना शिवराज मोरे यांनी मारला.

आ. आनंदराव पाटील यांच्यावर कॉग्रेसच्या कराड दक्षिणच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात सर्वच वक्त्यांनी अत्यंत जोरदार टीका करण्यात आली. मा. मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांचे अत्यंत विश्वासू म्हणून राजकारणात पाहिले जात होते, त्या आ. आनंदराव पाटील यांच्या मुलानी आणि पुतण्याने भाजपात प्रवेश केला असल्याने कार्यकर्त्यांना मेळाव्यात आ. पाटील यांच्यावर आरोपाच्या फैरी झाडल्या.

माजी मंत्री राजेंद्र मुळुक म्हणाले, आ. चव्हाण बाबांच्या नावामुळे काहींना किंमत मिळाली आहे. ज्या लोकांना मांडीवर खेळवले ते लोक आज पक्ष सोडून जाण्याच्या तयारीत आहेत. या लोकांना जर बाबाचं नाव नसतं तर मुख्यमंत्र्यांनी बोलावल तरी असत का ?

नामदेव पाटील म्हणाले, आनंदराव पाटील हे कॉग्रेसपक्ष सोडून गेले, मात्र त्यांची समजूत काढण्याचा मी प्रयत्न केला. मात्र त्यांनी स्वतः मुंबईत जावून पुतण्याला व मुलाला तेथे नेऊन भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. कॉग्रेस पक्षाने त्यांना १७ वर्षे जिल्हाध्यक्ष पद दिले, स्वर्गीय पी. डी. पाटील यांच्या विरोधात दोन वेळा आमदारकीचे तिकिट दिले, कृष्णा खोरे उपाध्यक्ष दिले तसेच विधानपरिषदेवर आमदारकीही दिली. तेव्हा तुम्ही जाण्यामुळे आमच्यावर काही फरक पडत नाही, तुम्ही इथले नाही, तुम्ही बार्शीचे आहात, तुमच्या विजयनगर गावात तुमच्यापेक्षा जास्त मते आम्हांला असणार आहेत.

बंडानाना जगताप म्हणाले, काही लोकांच्या अंगावर झूल आहे. खरं तर ते बाजूला गेल्याने घाण गेली. आता जनता पेटून उठली आहे. तेव्हा आपली प्रतिमा किती स्वच्छ आहे, ते पहा. एकदा यांची झूल उतरावा म्हणजे त्यांना कळेल.

दिवसभराच्या ताज्या घडामोडी आणि विधानसभेच्या बातम्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.

WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra

इतर महत्वाच्या बातम्या –

राष्ट्रवादीत मला काय मिळाळं ठेंगा; उदयनराजे भोसलेंचा सवाल

सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजेंची लढत “या” दिग्गज उमेदवारासोबत?

तर उदयनराजेंच्या पाठींब्याने हा उमेदवार लढणार कराड दक्षिण मधून विधानसभा…

पृथ्वीराज चव्हाणांचे निकटवर्तीय आनंदराव पाटील भाजपाच्या वाटेववर?

कराड दक्षिणसाठी पृथ्वीराजबाबा की उंडाळकरकाका? बाळासाहेब थोरातांनी दिले “हे” उत्तर

स्वार्थासाठी राजीनामा देणार्‍या उदयनराजेंकडून निवडणूकीचा खर्च वसूल करावा..

Leave a Comment