नवी दिल्ली|भारतातील तेलाच्या किंमती काबुत ठेवण्यासाठी इराण सर्वतोपरी मदत करणार आहे. इराणचे दिल्लीस्थित राजदूत मसूद रिजवानियन रहागी यांनी आज त्यासंबंधी आपली भुमिका स्पष्ट केली आहे. भारतातील उसळलेल्या तेलाच्या किंमती काबूत ठेवण्यासाठी इराण सर्वोतोपरी मदत करणार असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले आहे.
यापूर्वी इरानचे उपराजदूतांनी ‘भारताने तेला संबंधी अमेरिकी निर्बंध स्वीकारले तर इराण देत असलेल्या विशेष सुटीला भारताला मुखावे लागेल’ असे वक्तव्य केले होते. तसेच भारताने सऊदी अरब, रूस, इराक, अमेरिका या देशाकडे तेलाची मागणी केल्यास भारत इराण तेल संबंध खराब होऊ शकतात असेही त्यांनी म्हटले होते. परंतु आज त्यांनी आपली सुधारित भुमिका मांडली आहे.
परमाणू डील मधून बाहेर पडलेल्या इराण वर अमेरिकेने कडक निर्बंध लादले होते. तसेच भारतासहीत अनेक देशांना नोव्हेंबर पर्यंत इराण कडून तेल खरेदी करू नये असे निर्देश दिले होते. परंतु भारताने यावर अद्याप कोणतीच भूमिका घेतली नव्हती. भारताने अमेरिकी निर्बधावर कसलीच भूमिका घेऊ नये यासाठी इराणने मंगळवारची तंबी दिली होती. इराणने भारताला तेलाच्या किंमती काबूत ठेवण्यासाठी मदत केल्यास पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.