प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी लिंबूचे विविध प्रक्रियायुक्त पदार्थांची करा निर्मिती आणि सुरू करा उद्योग

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। जगभरात कोरोनाचा विळखा वाढत आहे. अशा परिस्थितीत मानवी शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी लिंबुवर्गीय फळांचे आहारात सेवन करणे गरजेचे झाले आहे.  लिंबामध्ये व्हिटॅमिन ‘सी’ ची उपलब्धता जास्त असल्यामुळे शरीराची रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यास त्याचा चांगला उपयोग होतो. लिंबु सेवनामुळे रक्त शुद्धीकरणासाठी मदत होते, त्यामुळे शरीरात निर्माण होणाऱ्या विविध विषाणुंपासून मुक्तता मिळू शकते. लिंबु फळाच्या औषधी गुणधर्माचा विचार करता लिंबापासून लोणचे, लेमन ज्यूस, लेमन ऑईल, लेमन पावडर अशा प्रक्रियायुक्त उत्पादनांची निर्मिती करून त्याची निर्यात करणे सुद्धा सहज शक्य आहे. त्यादृष्टीने लिंबूवर आधारीत प्रक्रिया उधोगांची उभारणी करण्याकडे लक्ष देणे काळाची गरज आहे.

शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढते व विषाणूजन्य आजारांपासून संरक्षण होते. व्हिटॅमिन ‘सी’ च्या कमतरतेमुळे होणारा स्कर्व्ही रोग बरा करण्यासाठी लिंबाचा उपयोग होतो. थकवा दुर होतो, तसेच पचनक्रिया सुधारते. उन्हाळ्याच्या दिवसात शरीराचा दाह कमी करणे व तहान शमविण्यासाठी लिंबाचा उपयोग होतो. लठ्ठपणा कमी करण्यासाठी दररोज सकाळी उपाशी पोटी गरम पाण्याबरोबर मध व लिंबू सेवन केल्यास अतिरिक्त चरबी कमी होते. पित्त झाल्यास रोज लिंबाचे सरबत घेतल्यास पचनसंस्था सुधारते व भुक वाढते. वाळलेले लिंबू मधात घालून चाटण म्हणून घेतल्यास उचकी तसेच ओकारी थांबण्यास मदत होते. नायटे व डोक्यातील खवडे यावरही लिंबाचा रस चोळल्याने चांगला परिणाम होतो.

लिंबामध्ये जे औषधी गुणधर्म आहेत. त्यामुळे या फळातील प्रत्येक भागाचा उपयोग केला जातो. लिंबावर प्रक्रिया करून त्यापसुन लिंबाचे लोणचे, मिश्र लोणचे, चटणी, सरबत, स्क्वॅश, सुगंधी तेल, लाईम कॉर्डिअल, सायट्रिक अॅसिड, लायमोनिन तेल, रसायनापासून अर्क पशुखाद्य, तसेच लिंबूसत्व इ. पदार्थ तयार करता येतात. व त्याचा उपयोग जेवणामध्ये करण्यात येतो. लिंबावर प्रक्रिया करून  लिंबाचा रस केला जातो ज्याचे अनेक फायदे आहेत. या सर्व पदार्थांचा रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी उत्तम उपयोग होतो.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

Leave a Comment