पुणे प्रतिनिधी | भारतातील आघाडीच्या स्पेशालिटी ऑईल अँड फॅटस् उत्पादक असणार्या एएके कामानी प्रायवेट लिमिटेडने पुण्यामध्ये ‘कामानी बेकरी चॅलेंज 2018’स्पर्धेच्या तिसर्या संस्करणाचे आयोजन केले होते. या स्पर्धेस पुन्हा एकदा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. या चॅलेंजमध्ये शहरातील आघाडीच्या बेकरीज सहभागी झाल्या होत्या. यावर्षी स्पर्धेत प्रदीप स्वीट्सने आरोग्य श्रेणीतील विजेतेपद मिळवले. रोलॅक्स बेकरीला दुसर्या क्रमांकाचे तर श्री न्यू मॉडर्न बेकरीला शेफ्ज चॉईसचा पुरस्कार देण्यात आला. इस्माईल बेकरीने इनोवेशन श्रेणीमध्ये विजेतेपद मिळवले. या श्रेणीतील दुसर्या क्रमांकाचे बक्षिस न्यू क्राउन बेकरीला तर श्री हनुमान परफेक्ट बेकरीला शेफ्ज चॉईसचा पुरस्कार देण्यात आला.
आरोग्य श्रेणीतील विजेतेपदाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना प्रदीप स्वीट्सचे निखील बंसल यांनी सांगितले की, कामानी बेकरी चॅलेंजचे विजेतेपद मिळवल्याबद्दल आम्ही अतिशय रोमांचीत झालो आहोत. एएके कामानी आम्हाला नेहमीच आरोग्यदायी खाद्यपदार्थ बनवण्यासाठी आणि काही तरी नाविण्यपूर्ण कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहीत करण्याचे काम करते. आमचे कौशल्य दाखवण्यासाठी उत्कृष्ट प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन दिल्याबद्दल एएके कामानीच्या संपूर्ण टीमचे आम्ही आभारी आहोत.
इनोवेशन श्रेणीत विजेतेपद मिळवणार्या इस्माईल बेकरीच्या मुसा शमीम अन्सारी यांनी सांगितले की, यावर्षी कामानी बेकरी चॅलेंजमध्ये सहभागी होउन विजेतेपद मिळवणे हा अतिशय चांगला अनुभव आहे. एएके कामानीशी संलग्न राहून त्यांच्या सहविकास तत्वाचा एक भाग बनून काम करणे हा आमच्या व्यवसाय विकास, इनोवेशन आणि फूड डेव्हलपमेंटसाठीही महत्वाचे ठरत असते.