लोकसभा Live| मोदी सरकारवर आणलेल्या अविश्वास ठरावावरुन सध्या लोकसभेत गदारोळ सुरू आहे. काँग्रराेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या भाषणाची सणसणीत सुरुवात करत थेट पंतप्रधान नरेंन्द्र मोदींना फटकारले आहे. १५ लाख रुपये देण्याचे काय झाले? दोन कोटी रोजगार द्यायचे काय झाले? असे सवाल करत राहुल गांधी यांनी सरकारवर जोरदार टिका केली.
संरक्षण खात्यात हेलिकॉप्टर खरेदीत सावळा गोंधळ असल्याचा आरोप राहुल गांधीं यांनी सरकारवर करताच भाजपा खासदारांनी गदारोळ माजवला. संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन स्पष्टीकरण देण्यासाठी उठू लागल्या तेवढ्यात सभापतींनी राहुल गांधींच्या नंतर तुम्हाला संधी दिली जाईल असे सांगितले.
आपल्या भाषणामुळे गदारोळ माजला म्हणून राहुल गांधी यांच्या चेहऱ्यावर आनंद साफ दिसत होता. त्याच क्षणी राहुल गांधीनी पंतप्रधाना उद्देशून बोलण्यास सुरुवात केली. “प्रधानमंत्री मेरे आख मे आख डालकर बात नही कर सकते” असे राहुल गांधी म्हणाले आणि खुद्द मोदी पण खदखदून हसू लागले. राहुल गांधी म्हणाले “प्रधानमंत्री आप चोकीदार नही है, आप तो भागीदार है।” असे गांधी म्हणताच सभागृहात पुन्हा गदारोळ माजला.
सभागृहातील गदारोळ पाहून सभापती सुमित्रा महाजन यांनी लोकसभा दहा मिनिटांसाठी तहकूब केली.तहकूबी नंतर लोकसभा भरली आणि राहुल गांधी पुन्हा तडाखेबाज भाषण देऊ लागले.