मुंबई । यंदाच्या वर्षी अनेक दिग्गज कलाकारांनी आपला जीव गमावला आहे. कोरोना व्हायरस आणि अन्य कारणांमुळे मृत्यू पावलेल्या कलाकारांच्या अचानक जाण्यामुळे कलाविश्वाला त्याचप्रमाणे चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. दरम्यान प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांचा मुलगा आदित्य पौडवालचे निधन झालं. आदित्य ३५ वर्षांचा होता. मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे त्याचं निधन झालं असल्याची बाब समोर येत आहे. शनिवारी पहाटे त्याने अखेरचा श्वास घेतला.
आदित्य हा अरुण आणि अनुराधा पौडवाल यांचा मुलगा आहे. तो म्युझिक अरेंजर, निर्माता म्हणून कलाविश्वात काम करत होता. गेल्या काही दिवसांपासून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता अटी, नियमांचे पालन आदित्यवर मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
आदित्य पौडवाल यांनी आपली आई अनुराधा पौडवाल यांच्यासारखी बरीच भजनंही गायली आहेत. भारताचा सर्वात तरुण संगीत दिग्दर्शक म्हणून त्याच्या नावाचा समावेश ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये आहे. अनुराधा पौडवाल यांचे पती अरुण सुद्धा संगीतकार होते. त्यांचं देखील निधन झालं आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या ला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.