मुंबई | मराठा आरक्षणाचे आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत चालले आहे. त्याबरोबर राजकीय पक्षात आरोप प्रत्यारोपाचा जोर वाढू लागला आहे. मराठा आंदोलकांना रोखण्यासाठी मुख्यमंत्री पोलीस अधिकाऱ्यांची जात पाहून त्यांची ड्युटी लावतात. असा जातीवाद करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर राजीनामा द्यावा असा आरोप विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.
आंदोलनाचा आज सातवा दिवस होता. नवी मुंबईत आंदोलकांच्या दगड फेकीत पोलीस अधिक्षक गंभीर जखमी झाले आहेत. तसेच ठाण्यात सायंकाळ पर्यंत आंदोलन सुरू होते. तिकडे जोगेश्वरीत लोकल ट्रेन रोखून धरण्यात आली होती. ठीक ठिकाणी आंदोलकांना रोखण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आला आहे.
दरम्यान मराठा आंदोलकांशी सरकार चर्चा करायला तयार आहे. त्यांनी चर्चेला यावे असे एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.