फळबाग बागायतदारांसाठी महत्वपूर्ण आणि उपयुक्त अशी भाऊसाहेब फुंडकर योजना 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। अनेक शेतकरी पांरपारिक शेतीकडून वळत फळबागा घेत आहेत. फळ बागामुळे शेतकऱ्यांना एक स्थायी प्रकारचे कमाई मिळत असते. विशेष म्हणजे राज्य सरकारही फळबागाकडे शेतकऱ्यांनी वळावे यासाठी प्रोत्साहन देत आहे.  शेतकऱ्यांनी फुल, फळबागाचे क्षेत्र वाढावावे यासाठी राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसेही आग्रही आहेत.  दरम्यान फळबाग लागवड करणाऱ्यासाठी सरकार आर्थिक मदत करत आहे.  यासाठी एक योजनाही राबवली जात आहे. ही योजना आहे भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, १९९० पासून ही योजना लागू करण्यात आली आहे.

या योजनेसाठी पात्र होण्यासाठी शेतकऱ्याच्या नावे स्वतःचा सातबारा असणे आवश्यक असते. जर सातबारा उताऱ्यावर लाभार्थी संयुक्त खातेदार असेल तर सर्व खातेदारांचे फळबाग लागवडीसाठी संमतीपत्र गरजेचे असते. जर सातबाऱ्यावर कुळाचे नाव असेल तर कुळाचे संमतीपत्र लागते. ज्या शेतकऱ्यांची कुटुंबाची उपजीविका केवळ शेतीवर चालू मन असेल अशांना प्रथम प्राधान्य त्यानंतर अन्य शेतकऱ्यांचा विचार केला जातो.  किमान०.२० व कमाल ६.०० हेक्टर पर्यंत शेती असणाऱ्यांना याचा  लाभ घेता येतो. या योजनेसाठी महाराष्ट्र सरकारचे शंभर टक्के अनुदान आहे. मिळणारे अनुदान हे तीन वर्षाच्या कालावधीत मिळणार आहे. अनुदान मिळताना पहिल्या वर्षी ५० टक्के, दुसऱ्या वर्षी ३० टक्के, तिसऱ्या वर्षी २० टक्के याप्रमाणे अनुदान देय राहील. दरम्यान या योजनेसाठी अर्ज तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे करावा लागतो. 

या योजने अंतर्गत फळबाग लागवड कालावधी हा जून ते मार्च आहे. या योजनेनुसार शेतकरी त्यांच्या आवश्यकतेनुसार सर्व फळपिकांच्या कलमा रोपांची लागवड करता येते. फळबाग लागवडीसाठी शेतकरी यांना कृषी विद्यापीठ रोपवाटिका, राष्ट्रीय बागवानी मंडळ मार्फत मानांकित खाजगी रोपवाटिका तसेच कृषी विभागाच्या परवानाधारक रोपवाटिकेतून कलम रोपे खरेदी करता येतात. शेतकऱ्यांनी त्यांना तांत्रिक व प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर फळबाग लागवड करायची असते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

Leave a Comment