नवी दिल्ली | काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधीं यांनी आज लोकसभेत भाजपा सरकारच्या विरोधात ठेवण्यात आलेल्या अविश्वास ठरावावर जोरदार भाषण केले. भाषण करतेवेळी राहुल यांनी राफेर कराराबद्दल तिखट शब्दात सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. परंतु राफेर करारावर केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचे आता उजेडात येत आहे.
राहुल गांधींच्या भाषणाची वर्दी फ्रान्स पर्यंत गेली असून राहुल यांनी केलेले आरोप खुद्द फ्रान्सने फेटाळले आहे. राफेर करार मोदी सरकार सोबत झाला नसून तो मनमोहनसिंग सरकारशी झाला असल्याचा निर्वाळा फ्रान्स सरकार कडून करण्यात आला आहे.
राफेर विमान खरेदीची किंमत मोदींच्या दबावाने वाढवली असल्याचे राहुल गांधी लोकसभेत म्हणाले होते. त्यावर निर्मला सीतारामन यांनी सभागृहाला स्पष्टीकरण ही दिले होते. मोदी सरकारच्या काळात कोणताही राफेल करार झाला नाही असा निर्वाळा निर्मला सीतारामन यांनी दिला आहे. तोच सूर फ्रान्स सरकारने आळवल्याने राहुल गांधी तोंडावर आपटले आहेत.