बंगल्यामध्ये सुरु असणाऱ्या कुंटन खान्यावर छापा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी| स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबिंध कक्षाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संजयनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका बंगल्यावर छापा टाकून त्या ठिकाणी छुप्या पद्धतीने सुरु असलेला वेश्या अड्डा उध्वस्त केला. या ठिकाणाहून २ महिलांना अटक केली आहे, तर एका पीडित मुलींची सुटका करण्यात आली आहे.

सुभाषनगर येथील सपना जाधव या एजन्ट महिलेस व दिव्या शर्मा या घरमालकिणीस अटक करण्यात आली आहे. यातील सपना ही स्वतः वेश्या व्यवसायासाठी मुली पुरवून दिव्याच्या भाड्याने घेतलेल्या बंगल्यात वेश्या  व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून वेश्या व्यवसायासाठी मुली, महिला पुरवते अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेशनच्या पथकाला मिळाल्यानंतर त्याठिकाणी बोगस ग्राहक पाठवून छापा टाकला होता. या ठिकाणाहून २ महिलांना अटक करून एका पीडितेची सुटका केली आहे.

अटक केलेल्या २ महिलांच्यावर संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, अपर पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले, पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली.

Leave a Comment