बाप रे! महिलेच्या पोटातून काढली 24 किलो वजनाची गाठ, डॉक्टरही झाले चकित

0
24
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | डॉक्टर हे देवासमान असतात.अनेक वेळा डॉक्टर प्रतिकुल परिस्थितीतही जीवाची बाजी लावून रुग्णाचे प्राण वाचवतात.अशीच 1 गोष्ट मेघालय मध्ये घडली आहे .तेथे एका डॉक्टरनं महिलेला मोठ्या संकटातून वाचवलं आहे. कोरोनाच्या काळात महिलेवर ट्यूमरचं ऑपरेशन यशस्वी झालं आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही गाठ 24 किलो वजनाची असल्याचं समोर आलं आहे. या ऑपरेशन नंतर डॉक्टरही चकित झाले.

मेघालयमध्ये वेस्ट गोरा हिल्स जिल्ह्यातील एका रुग्णालयात महिलेवर शस्रक्रिया करण्यात डॉक्टरांना मोठं यश आलं. या महिलेच्या पोटातून 24 किलो वजनाची गाठ काढली आहे. पीटीआयनं दिलेल्या वृत्तानुसार इस्ट गारो हिल्स जिल्ह्यातील जामगे गावात राहणाऱ्या 37 वर्षीय महिलेच्या पोटात अचानक कळा येऊ लागल्या आणि या कळा असह्य झाल्यानं तातडीनं रुग्णालय गाठलं.

या महिलेला 29 जुलैला तूरा इथल्या प्रसूतीगृहात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांच्या टीमनं 3 ऑगस्ट रोजी या महिलेवर शस्रक्रिया केली. त्यावेळी या महिलेच्या पोटातून 24 किलोची गाठ काढण्यात आली. या घटनेनं डॉक्टरही चक्रावून गेले.

सध्या या महिलेची प्रकृती ठिक असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या महिलेच्या पोटातील गाठ तपासणीसाठी पाठवण्यात आली असून कॅन्सरची नसल्याचा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here