बाळासाहेब ठाकरेंनी असा अपमान कधीही सहन केला नसता : रामदास आठवले

0
104
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नागपूर :- काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दबावात ते काम करत आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनी असा अपमान कधीही सहन केला नसता. उद्धव ठाकरे यांनी परत भाजपसोबत आले पाहिजे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नामुष्कीची वेळ आली आहे. मध्य प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रातदेखील राजकीय भूकंप होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे वक्तव्य केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केले. नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते .

‘ मध्यप्रदेशमध्ये सध्या जे काही राजकारण सुरू आहे त्याचे पडसाद महाराष्ट्रातदेखील उमटू शकतात. मध्यप्रदेशमध्ये ज्योतिरादित्य सिंदिया यांना भाजपने फोडलेले नाही. मध्यपदेशमध्ये कमलनाथ सरकार अल्पमतात आहे. परंतु त्यांना बहुमत चाचणीसाठी वेळ मिळाला. त्यांच्याप्रमाणे बहुमत सिद्ध करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना जास्त वेळ मिळाला असता तर चित्र वेगळे राहू शकते, असे रामदास आठवले म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here