पुणे | देशात प्रथम पर्यावरणपूरक वास्तू (ग्रीन बिल्डिंग) अभ्यासक्रम सुरू केल्याबद्दल महर्षी स्त्रीशिक्षण संस्थेच्या डॉ.भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वूमेनचे (बीएनसीए) प्राचार्य डॉ. अनुराग कश्यप यांना ग्रीन चॅम्पियन अॅवॉर्ड देऊन नुकतेच गौरवण्यात आले.
देशात सर्वप्रथम ग्रीन बिल्डिंग चळवळीचा भाग म्हणून बीएनसीएमध्ये एनव्हायरमेंटल आर्किटेक्चर (पर्यावरणीय वास्तूरचनाशास्त्र) हा अभ्यासक्रम त्यांनी 2006 मध्येे सुरू केल्याबद्दल हा पुरस्कार आयजीबीसी या संस्थेच्या पुणे शाखेतर्फे आयोजित करण्यात आला होता. डॉ.कश्यप यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.
डॉ.कश्यप यांच्या पुढाकारातून बीएनसीएमध्ये पर्यावरणीय वास्तूरचनाशास्त्राच्या अभ्यासक्रम सर्वसमावेशक असून त्यामध्ये इमारतीच्या आराखड्यापासून व बांधकामापासून ते शहर नियोजनापर्यंत पर्यावरणाचा व्यापक विचार करण्यात आला आहे. यामध्ये पर्यावरणासंबंधीचे कायदे, बांधकामासाठी लागणारे पर्यावरणस्नेही साहित्य अशा अनेक गोष्टी विद्यार्थिनीेेंना शिकवल्या जातात. हा विषय घेऊन बाहेर पडलेल्या बीएनसीएचे अनेक विद्यार्थी सरकारी तसेच खासगी क्षेत्रात उच्चपदावर काम करत आहेत.
याशिवाय देण्यात आलेल्या पुरस्कारात जॉन्सन कंट्राल्सचे महाव्यवस्थापक श्रीकांत बापट, अमर बिल्डरचे कार्यकारी संचालक हृषिकेश मांजरेकर, भावरिया मोटर्सचे संचालक विशाल आगरवाल इत्यादींचा समावेश आहे.
या सोहळ्यास आयजीबीसीचे नवनिर्वाचित अध्यक्ष व्ही.सुरेश, उपाध्यक्ष गुरमित सिंग यांनाही वरील पुरस्कारांनी गौरवण्यात आले. तसेच सीआयआयचे प्रदीप भार्गव, आयजीबीसीचे माजी अध्यक्ष संजय किर्लोस्कर आणि ग्रीनकोचे अध्यक्ष अनिल सिन्हा आणि आर्किटेक्ट पूर्वा केसकर उपस्थित होते.