मुंबई ते अहमदाबाद संकल्पित बुलेट ट्रेनला अनेक अडचणीतून जावे लागत आहे. पालघर मधील फलोत्पादक शेतकऱ्यांनी केलेला विरोध मावळतो ना मावळतो तोपर्यंत नवीन समस्या बुलेट ट्रेन समोर येऊन उभी ठाकली आहे. विक्रोळी मध्ये स्थित गोदरेज कंपनीच्या मालकीच्या ३.५ हेक्टर जमिनीचे अधिग्रहण केल्या शिवाय बुलेट ट्रेन पुढे सरकू शकत नाही. गोदरेज कंपनी च्या जमिनीचे बाजार मूल्य ५०० कोटी रुपये आहे. गोदरेज कंपनी न्यायालयात गेली तर बुलेट ट्रेन कायदेशीर कचाट्यात गुंतून पडण्याची शक्यता आहे. सरकारने ठरवले तर महाराष्ट्र जमिनी अधिग्रहण अधिनियम २०१३ नुसार जमीन अधिग्रहण करून गोदरेज कंपनीला मात देऊ शकतात.
१.८ लाख कोटीच्या बुलेट ट्रेन प्रकल्पातील १०,००० कोटी रुपये जमीन अधिग्रहण करण्यासाठी प्रस्तावित आहेत.