भर सभागृहात उतू गेलं प्रेम, नगरसेवकाने घेतलं नगरसेवकाचे चुंबन; अनेकजण पाहतच राहिले,पहा व्हिडीओ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर

महानगरपालिकेच्या सभागृहात शाब्दिक भांडणं, मारामाऱ्या झालेल्या तुम्ही पहायल्या असतील पण कोल्हापूर महानगरपालिकेच्या सभागृहात एक अजबच प्रकार घडला आहे. ताराराणी आघाडीचे नगरसेवकाने सत्ताधारी काँग्रेसच्या नगरसेवकाची भर सभागृहात चुंबन घेतले आणि सभागृहातील प्रत्येकजण पाहतच राहिला. महानगरपालिकेची सभा सुरु असताना हा प्रकार घडला. विरोधीगटाच्या नगरसेवकाने सत्ताधारी काँग्रेसच्या गटनेत्याची चुंबन घेतल्याने सर्वजण अवाक् झाले.

महानगरपालिकेत आज विरोधी गट असलेल्या ताराराणी आघाडीचे नगरसेवक कमलाकर भोपळे सत्ताधारी गटाच्या बाकावर जाऊन बसले. त्यांच्या शेजारी काँग्रेसचे गटनेते आणि स्थायी समितीचे सभापती शारगंधर देशमुख बसले होते. सभागृहाचे कामकाज सुरु झाले आणि अभिनंदनाचे ठराव सुरु असतानाच, भोपळे आणि देशमुख यांच्यात काहीतरी बोलणे झाले. त्यानंतर खुशीत असलेल्या कमलाकर भोपळे यांनी भरसभागृहात शारगंधर देशमुख यांच्या गालाची पप्पी घेतली.

अचानक झालेल्या याप्रकारामुळे सर्व सभागृहात एकच हशा पिकला. नेमकी काय चर्चा सुरु होती हे समजले नाही, मात्र सभागृहात अशा वागण्यामुळे त्याची उलटसुलट चर्चा सुरु होती. पुरुष नगरसेवकाने पुरुष नगरसेवकाचे चुंबन घेतल्याने, महिला नगरसेविका मात्र गालावर हात ठेवून लाजल्या.

ताज्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या 8080944419 या नंबरवर Whatsapp करा आणि लिहा ”Hello News”