‘भाकप’ तर्फे कोल्हापूर उत्तरसाठी उमेदवार जाहीर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी। भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून सतीशचंद्र कांबळे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या संदर्भात भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने अधिकृत उमेदवार आज जाहीर करण्यात आला आहे. युती सरकारने शेतकरी, विद्यार्थी, अल्पसंख्यांक, दलित महिला आणि असंघटित कामगार यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केलं आहे. ‘विरोधी पक्ष कमकुवत ठरल्याने सक्षम पर्याय म्हणून भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या बाजूने जनतेचा कौल देत कोल्हापूर उत्तर मतदारसंघात सतीशचंद्र कांबळे यांच्या पाठीशी राहावे’ असे आवाहन भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने पत्रकार परिषदेत करण्यात आले आहे.

सध्याच्या संघनियंत्रित भाजप सेना युती सरकारला खाली खेचणे ही भाकपची प्राथमिकता असल्याचे भाकप पक्षाने स्पष्ट केले आहे. त्यासाठी धर्मनिरपेक्ष पक्षासोबत आघाडी करण्याचे प्रयत्न गेल्या महिनाभरापासून सुरू असल्याची माहिती आहे. अशी आघाडी करण्यासाठी डावी आघाडी एकत्रितपणे प्रयत्न करीत असून डाव्यासह व्यापक आघाडी अस्तित्वात आली तर मर्यादित जागावरच निवडणूक लढवण्याचेही राज्य कार्यकारिणीने ठरवले आहे. परंतु अशी आघाडी न झाल्यास सर्व २४ जागा पूर्ण क्षमतेने भाकप लढवणार आहे.

दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर कोल्हापूर उत्तरकडे आता जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. युती आणि आघाडीने आपआपले उमेदवार लढविण्याची तयारी दाखवली असताना भाकप कडून उमेदवार जाहीर झाल्याने ही लढत अजून च तुल्यबळ होणार असल्याचे दिसत आहे.

Leave a Comment