नवी दिल्ली | संसदेचे पावसाळी अधिवेशन आज पासून सुरू झाले आहे. लक्षवेधी सूचना मांडून सरकारचे लक्ष महत्वाच्या विषयावर आकर्षित करून घ्यायचे असते यासाठी लक्षवेधी सुचनेची रचना करण्यात आली आहे. परंतु आज भाजपच्या खासदाराने लोकसभेत मांडलेली लक्षवेधी ऐकून आपणास हसू आल्याशिवाय राहणार नाही.
भाजचे मेरठचे खासदार राजेंद्र अग्रवाल यांनी आज लोकसभेत टीव्ही वर दाखवल्या जाणाऱ्या जाहिराती ह्या स्टंटवर आधारित असतात अशी अजब लक्षवेधी सूचना लोकसभेत मांडली. स्टंटवर आधारित जाहिरातीत जसे दाखवले जाते अगदी तसे स्टंट मुलं करण्याचा प्रयत्न करतात. बनियलची जाहिरात दाखवली जाते त्यात बनियन घातलेला व्यक्ती जशी कृती करते तशी कृती मुले करण्याचा प्रयत्न करतात असे लक्षवेधी सुचनेत अग्रवाल म्हणाले आहेत.
देशामध्ये अनेक प्रश्न आ वासून उभे असताना खासदार या जबाबदारीच्या पदावर असलेल्या व्यक्तीने असे हस्यपद मुद्दे लोकसभेत मांडल्यावर लोकसभेच्या गरिमेला धक्का बसत आहे.