बेंगलुरू: पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी दोन दिवसांच्या दौऱ्यावर कर्नाटक राज्यात बंगळुरू येथे दाखल झाले आहेत. मोदी यांचे कर्नाटकात आगमन होताच मागील काही तासांपासून #GoBackModi हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड होत आहे. यापूर्वी पंतप्रधान मोदी चेन्नईच्या दौऱ्यावर असताना हा ट्रेंड अनेक वेळा दिसून आला होता, परंतु कर्नाटक या भाजपशासित राज्यात हे पहिल्यांदाच घडत आहे.
त्यांच्या आगमनपर पंतप्रधान मोदींचे कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा आणि इतरांनी स्वागत केले. तुमाकुरुमधील श्री सिद्धगंगा मठाच्या भेटीसह पंतप्रधान मोदी राज्यातील विविध कार्यक्रमांमध्ये भाग घेत घेत आहेत. सिद्धगंगा मठ दौऱ्यात मोदींनी श्री श्री शिवकुमार स्वामीजींच्या स्मारक संग्रहालयाच्या पायाभरणीच्या चिन्हाचे अनावरण केले.
तत्पूर्वी पीएमओच्या निवेदनात म्हटले होते की, पंतप्रधान मठ येथे प्रार्थना करतील आणि रोपांची लागवड करतील. मुख्यमंत्री येडियुरप्पा आणि सिद्दलिंगेश्वर स्वामी यांच्यासह अन्य मान्यवर या वेळी उपस्थित राहणार आहेत. यावेळी पंतप्रधान एका संमेलनाला संबोधित करतील.