जळगाव आणि सांगली महानगर पालिकांचा अंतिम निकाल जाहीर, भाजपा विजयी

Thumbnail 1533299991042
Thumbnail 1533299991042
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली/जळगाव | मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या राज्यातील दोन महानगरपालिकांच्या निवडणुकीत भाजपा ने विजय मिळवला आहे. सांगली आणि जळगाव या दोन्ही पालिकांमधे भाजपा ला एकहाती विजय मिळाला आहे. मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस यांनी त्याबद्दल जनतेचे अभिनंदन केले तसेच निकालातून जनतेचा कौल भाजप च्या बाजूने असल्याचे स्पष्ट झाले असल्याचे सांगितले.
सांगली महानगरपालिकेत भाजपाचा ४१ जागी विजय झाला असून कॉग्रेस आघाडीला ३५ जागांवर समाधान मानावे लागले. सत्ता जिंकण्याची वलग्ना करणाऱ्या शिवसेना ला सांगलीत खातेही उघडता आलेले नाही. भाजपच्या नेत्यांनी प्रचारात घेतलेले कष्ट आणि बुत गणिक पेरलेले कार्यकर्त्यांचे जाळे भाजपाच्या पथ्यावर पडले आहे.
जळगावच्या राजकारणातील चाळीस वर्षांची राजवट या निवडणुकांनी संपुष्टात आणली आहे. सुरेश दादा जैन यांचा जळगाव पालिकेत तब्बल ४० वर्षे दबदबा होता. तो खांदून काढण्यासाठी भाजपाने गिरीश महाजन यांच्या सारखा हुकमी एक्का नेतृत्वासाठी नेमला होता. योग्य नियोजनामुळे भाजपाचा जळगाव मध्ये अभूतपूर्व विजय मिळाला आहे. भाजपचे जळगावसाठीचे ‘मिशन फिफ्टी प्लस’ यशस्वी झाले आहे. जळगाव मध्ये भाजपला ५७ जागी विजय मिळाला असून शिवसेनेला फक्त १५ जागी समाधान मानावे लागले आहे. तर ३ जागी एम.आय.एम. विजयी झाली आहे.
आजच्या निकालाने भाजपच्या गोट्यात आनंदाचे वातावरण असून भाजपाचा लोकांमध्ये अजूनही प्रभाव कायम असल्याचे या निवडणुकीने दाखवून दिले आहे. सांगली सारखी महत्वाची महानगरपालिका कॉग्रेसला गमवावी लागली आहे.